ढोल-ताशा-लेझीम, झिंग…
ढोल ताशा चा जन्म नक्की कधी कुठे झाला, मूळ वाद्य कोणतं होतं, कोणत्या देशात, कोणत्या संस्कृतीत, या बद्दल बरेच संदर्भ मिळतात. पर्शियन संस्कृतीमधून साधारण पंधराव्या शतकाच्या आसपास ढोल भारतामध्ये पोचला असं मानतात. मूळ पर्शिअन ‘डोहोल’ नावा चं हे चर्म वाद्य विजय नाद करण्यासाठी वाजवलं जात असे किंवा काही विशिष्ट हेतू जाहीर करण्यासाठी देखील ढोलाचा वापर केला जात होता. युद्ध गर्जनेपासून ते उत्सवाची सुरुवात झाली आहे हे सांगण्यापर्यंत.
पंजाब, आसाम, गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगाल. भारतातल्या जवळपास प्रत्येक राज्याच्या कला प्रकारांमध्ये ढोलाचं महत्व मोलाचं आहे. भांगडा, पोंगल, शिमगा, गरबा, दुर्गापूजा, दांडिया, कव्वाली. अशा किती तरी समूह नृत्यांमध्ये / उत्सवांमध्ये ढोलाचं स्थान मध्यवर्ती आहे. किंबहुना, ढोला च्या बेभान तालाशिवाय आपण उत्सवांची कल्पनाही करू नाही शकत. देशाच्या दुर्गम भागात राहणारे आदिवासी! दिवसभर कष्ट केल्यावर रात्री ढोलावर थाप पडता क्षणी, बेभान तालावर पाय थिरकणारच. सगळी मरगळ उतरून, वयाचं, स्थळकाळाचं भान विसरून. ढोलाबरोबर घुमत राहणे! कमालीचा stress buster!! 🙂
महाराष्ट्र मध्ये मुख्यत्वेकरून सार्वजनिक उत्सवांसाठी ढोल वाजवला जातो आणि तो देखील आपल्या आवडत्या गणेशोत्सवामध्ये. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात, उत्सवाच्या निमित्ताने का होईना, सामान्य माणसाला एका समान पातळीवर आणता आलं ते काही अंशी गणेशोत्सवामुळे! गणपती बाप्पांना प्रतिस्थापित करताना आणि निरोप देतानासुद्धा, ढोल – ताशाचा गजर अनिवार्य! या बेभान गजराशिवाय गणेशोत्सव अपूर्ण ठरावा अशी काहीशी परिस्थिती! हा ढोल -ताशाचा ‘जल्लोष’ सुरु करताना लोकमान्यांचा हेतू आम्ही अग्रभागी ठेवणार आहोत. आणि आधुनिक संगीताला सहज मागे टाकेल अश्या ढोल – ताशाच्या तालावर धुंद होणार आहोत. तुम्हाला ही सामील करून घेणार आहोत.



Our mission
A small group of people started Indian Roots, USA in 2012 with a vision of connecting the cultural roots and help underprivileged but deserving Children's education.
We are calling it ‘Jallosh’ …… meaning ‘Celebrating with Community’. Surely, we all have experienced the wonderful Nostalgia, when we think about our birthplace, childhood memories….. and music; among so many other things! While coming together to start a new social commitment we found a surprisingly common thread between us. Dhol- Tashaa….. playing Indian traditional drums…. Hence, we decided to make this ‘joyous beating’ the face of our social organization.
We happily agreed to practice and enjoy playing drums for our own pleasure, but keeping a strong focus on the commitment to support a good cause. Thus, we enjoy our passion for Dhol –Tashaa and through this gathering we support a chosen social activity. Taking our passion further, Jallosh is now able to share our joys within communities here.
जल्लोष म्हणजे….
जल्लोष म्हणजे अमाप जोश आणि सळसळता उत्साह…
जल्लोष म्हणजे फुरफुरते बाहू तरीसुद्धा शक्ती…
जल्लोष म्हणजे अतूट मैत्री आणि घट्ट नाती…
जल्लोष म्हणजे सामाजिक हेतू आणि अर्थपूर्ण संघटना!!
“One is zero but two are infinity”
हे जल्लोषची भूमिका स्पष्ट करते.
सामाजिक हेतूनी एकत्र येण्यासाठी ही संघटना आहे.
ढोल-ताशा वादन हे केवळ माध्यम आहे.
आपण फक्त कलाकारांचा गट नसून
जल्लोष म्हणजे कार्यकर्त्यांचा संच आहे!


Our team
A dedicated team of servant leaders help coordinate to achieve our dreams!
Mukund Khisty
Founder & Trustee, Indian Roots USA (Jallosh)
+1.732.307.4237
